उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

212 0

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं

यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल- बालन यांनी फडणवीस यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!