Sanjay Kakde

Shivajirao Bhosle Bank Case : संजय काकडे यांच्यासंबंधी प्रकरणात व्याजासह थकीत कर्जवसुली करावी; विकास कुचेकरांची मागणी

483 0

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात संजय काकडे यांच्यासह त्यांच्या संबंधित कंपन्यांना बेकायदेशीर कर्जे दिली आहेत. कर्ज देताना बँकेच्या संचालकांनी नातेवाईकांना कर्ज देण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेच्या कायदे व नियमांचे उल्लंघन करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज दिले आहे. त्यामुळे प्रशासकांनी ही कर्जप्रकरणे वन टाइम सेटलमेंटने (ओटीएस) न मिटविता व्याजासह थकीत कर्जवसुली करावी, अशी मागणी याचिकाकर्ते मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने अध्यक्ष विकास कुचेकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात कर्जदार, जामीनदार व बँक संचालक, व्यवस्थापक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्च 2024 रोजी होणार आहे.

विकास कुचेकर यांनी बँकेचे प्रशासक आणि सहकारी संस्थांचे आयुक्त यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. संजय काकडे याच्या संबंधातील व्ही. वाय, इन्फ्रा स्ट्रक्टर प्रा. लि.,जोनास होल्डिंग प्रा. लि. काकडे ग्रीन इस्टेट प्रा. लि., मे. पुष्पकर प्लाय, काकडे प्लेस मंगल कार्यालय आदी कंपन्यांचे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे कर्ज खाते आहे. या कर्जाचे ओटीएस दाखल करण्यात आले आहे.

या कर्ज खाते प्रकरणात 101 च्या कार्यवाहीचे आदेश होऊन व्याजासह जवळपास 60 कोटींची वसुली आहे. बनावट कागदपत्र व बँकेच्या कायद्याचे उल्लंघन करून बँकेच्या ठेवीदार सभासदांचा विश्वासघात करून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता बँक बुडण्यास कारण ठरले आहे. असे असताना आता असे ओटीएस करून कर्जात सूट मिळून गुन्हा माफ करण्यासारखे आहे. तरी या प्रकरणात कोणतीही सूट न देता संपूर्ण व्याजासह कर्ज वसुली करावी, अशी मागणी कुचेकर यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Manoj Jarange : ‘तो’ फोन आला अन् जरांगे सलाईन काढून तातडीने अंतरवालीला रवाना

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!