पुण्यातील एका आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका तरुणाने पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करून या तरुणाला ताब्यात घेतले. उदयकुमार राय असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने पोलिसांना फोन करून आमदार लांडगे यांची सुपारी मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
संबंधित आरोपी उदयकुमार राय हा मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी परिसरात राहतो. तर त्याने ही धमकी नेमकी का दिली, आता पाच पोलीस करत आहेत.