भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी

350 0

पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर तसेच त्यांचे दीर व माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करुन ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अ‍ॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!