Breaking News

कात्रज परिसरात आढळला जळालेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह

600 0

पुणे- कात्रजच्या दरीमध्ये एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, कात्रज दरीत एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने संबंधित तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, गाडीच्या नंबर प्लेटवरून संबंधित तरूण वानवडी भागात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा घातपात आहे की अपघात , याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, संबंधित तरूण रागाच्या भरात घरातून दोन दिवसांपूर्वी बाहेर पडला होता अशीही माहिती पुढे आली आहे.

Share This News
error: Content is protected !!