Daund News : पुण्यातील दौंडच्या पाटस टोल नाक्यावर मोठी कारवाई करत 31 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना (Daund News) अटक करण्यात आलीये.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यामधून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने (Daund News)कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर सापळा रचत तब्बल 31 लाख 56 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमध्ये 4,779 मध्याच्या बाटल्या म्हणजेच 84 बॉक्स, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चार चाकी वाहन तसेच हॉटेल्स आणि घरांमध्ये साठवलेला बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल.
गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्कीचे त्रेचाळीस बॉक्स आढळून आले. यामध्ये एकूण 31.56 लाखांचा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष मार्कड आणि वैभव तरंगे या दोघांना अटक केली आहे. या पथकाला पुणे जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी छाती टाकून मोठी कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख,सह आयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष अतुल कानडे उपाधीक्षक उत्तम शिंदे, पोलीस निरीक्षक विजय रोकडे, शहाजी शिंदे एम व्ही गाडे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी होते.