हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या जीवास धोका – संजय राऊत

298 0

पुणे: उदयपुर येथील घटनेचं लोण महाराष्ट्रात देखील पसरलं असून अमरावतीमध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पुणे पोलिसांनी सुरक्षा द्यावी असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे  यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घ्यावी, असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!