CYLINDER BLAST IN PUNE : पुण्यातील भंगाराच्या गोदामात सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

CYLINDER BLAST IN PUNE : पुण्यातील भंगाराच्या गोदामात सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

580 0

पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील बी टी कवडे रोड परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामात असलेल्या सिलिंडरचा स्फोट (cylinder blast in pune) झाला आहे. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याविषयीची माहिती अग्निशमन दलाला साडेपाच वाजता कळवण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि जखमी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केलं. दरम्यान दोन जखमी कामगारांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एकाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या तिघांपैकी एकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी हे चारही कामगार त्या ठिकाणी काम करत होते. महंमद शेख, किशोर साळवे, दिलीप मिसाळ, महंमद सय्यद अशी या कामगारांची नावं आहेत. दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide