पुणे- बालविवाह करुन मारहाण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या सफाई कंत्राटदारावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 36 वर्षीय आईने तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिनेश रघुनाथ शिंदे (25), त्याचे वडील रघुनाथ मारुती शिंदे यांना अटक केली आहे. त्यांच्यासह सासू , दीर ऋषिकेश रघुनाथ शिंदे व कमलेश रघुनाथ शिंदे (सर्व रा.वैदवाडी,हडपसर,पुणे) यांच्यावर पोक्सो आणि बाल विवाहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, डिसेंबर 2018 मध्ये पिडीत मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना दिनेश शिंदे याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिला राहत्या घरातून ऑक्टोबर 2020 मध्ये पळवून नेत आळंदी येथे त्याचे वडील रघुनाथ शिंदे, आई कविता शिंदे, भाऊ ऋषिकेश शिंदे व कमलेश शिंदे यांच्या उपस्थितीत विवाह केला.
हे समजल्यानंतर मुलीच्या आईने यासंर्दभात तिच्या सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करते असे मुलीस सांगितले होते. मात्र मुलीने मी आत्महत्या करेल अशी धमकी दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. परंतु मुलगी नांदायला गेल्यानंतर तिला पतीने मारहाण करुन ती अल्पवयीन आहे माहिती असतानाही तिचे सोबत शरीर संबंध ठेवले. तसेच त्याचे बाहेर अन्य मुलीशी संबंध असल्याचा संशयही पिडित मुलीने व्यक्त केला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करत आहे.