मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

509 0

पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. ही घटना हडपसर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता दिलीप खाटपे (वय 45) असे आरोपी महिलेचे नाव असून याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. याचाच राग मनात भरून ही महिला सोसायटीतील एकच कुत्रा जिवंत ठेवणार नाही असे म्हणुन हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती.

या महिलेने दोन पिलांना काठीने बदडून ठार केले. त्यानंतरही दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. हातात काठी घेऊन फिरत असताना ही महिला अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. कुत्र्याला का मारता अशी विचारणा केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत अरेरावी केली.

कुत्र्याच्या दोन पिल्लाना या महिलेने ठार केल्याचे समजताच सोसायटीमधील एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे श्वानप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हडपसर पोलीस तपास करत आहेत.

Share This News

Related Post

इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय ? भारतामध्ये कुठे बांधला जाणार ? जाणून घ्या

Posted by - April 6, 2022 0
इलेक्ट्रिक हायवे- देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी भारत सरकारने मोठी बातमी आणली आहे. ही…

वैज्ञानिक संशोधनात आवड, संयम आणि सातत्य गरजेचे -डॉ.नितीन करमळकर

Posted by - February 23, 2022 0
वैज्ञानिक संशोधन कसे चालते, याची योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरीता इंडस्ट्री आणि महाविद्यालये यामध्ये देवाणघेवाण व समन्वय असणे…

पराभवाच्या रागातून चक्क ढाबा पेटवून दिला! सांगली जिल्ह्यातील घटना

Posted by - March 9, 2022 0
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांनी नव्यानेच ढाबा बांधला होता. सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या…

PMPML च्या ई-बस डेपोचं उद्या उद्घाटन ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Posted by - September 1, 2022 0
पुणे : PMPML च्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार…

धक्कादायक : पुण्यात 899 KG नकली पनीर जप्त ; एकूण 4 लाख किमतीचा साठा जप्त

Posted by - September 6, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *