पुणे: पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी व पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मातोश्री माधुरी उर्फ अनिला शिरोळे यांचा आज निधन झालंय. सकाळी 10:17 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दर्शनासाठी त्यांचे पार्थिव घोले रोड येथील त्यांच्या राहत्या घरी दुपारी दोन ते चार या वेळेत ठेवण्यात येणार असून साडेचार वाजता वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.