भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष,आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

240 0

पुणे: भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे  यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले.

त्या 65 वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुले आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे,सूना नातवंडे असा परिवार आहे.

भाजपच्या विधानपरिषद सदस्या उमा खापरे,पक्षाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक शंकर जगताप,प्रदेश सचिव अमित गोरखे,’भाजयुमो’चे प्रदेश प्रदेश सचिव अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर समन्वयक आणि माजी महापौर योगेश बहल,राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदींनी आ‌.लांडगे व परिवाराचे सांत्वन केले आहे.दरम्यान हिराबाई लांडगे यांच्या निधनामुळे भोसरीतील बैलपोळ्याची आजची मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवकचे अमित लांडगे यांनी जाहीर केले आहे.

Share This News
error: Content is protected !!