पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात स्वच्छता मोहीम

212 0

पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
संपुर्ण शहरभर १००० ठिकाणी स्वच्छता महाअभियान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे नेतृत्वाखाली राबविले गेलं  त्याच अनुषंगाने पुणे शहर सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दांगट यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी वारजे हायवे चौक,वारजे वाहतुक विभाग परिसर , एनडीए रोड काही भाग, वारजे पोलिस स्टेशन परिसर ,वारजे मजुर अड्डा परिसरात स्वच्छता करण्यात आली .

यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून १७ सप्टेंबर या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे.

याप्रसंगी पुणे शहर सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दांगट ,वरिष्ठ पोलीस निरिक्षक हाके साहेब,मनिषा सचिन, दांगट सुभाष अगरवाल,चुनीलाल शर्मा,ऋषिकेश रजावात,व्यंकटेश दांगट अमित कुलकर्णी,सुनिल जावरे,अमजद अन्सारी,विक्रम जगदाळे, सुरेश पोटे,मनिषा ढोले यांचेसह स्मिता पाटील विद्यालयाचे शिक्षकासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!