Breaking News

अजित पवारांच्या नेत्याकडून नागरिकाला मारहाण; अजित पवार म्हणाले…

407 0

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाबुराव चांदेरे यांच्यावर या प्रकरणी आता बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. विजय रौंदळ हे व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी करण्यात आली. जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी रौंदळ यांना मारहाण केली. त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार घडला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान चांदेरे यांच्या या कृत्याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!