पुण्यात कर्वेनगर भागातील शितळादेवी भैरवनाथ मंदिरात चोरी, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

677 0

पुणे- पुण्यात कर्वेनगर भागातील शितळादेवी भैरवनाथ मंदिरातील चार दानपेट्या फोडून चोरट्याने 75 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने मंदिरातील घंटाही चोरून नेली आहे. मंदिराच्या शेजारीच कर्वेनगर पोलीस चौकी असूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार कर्वेनगर व हिंजवडीमध्ये असलेल्या मंदिरातही घडला होता. चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!