Shivneri

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

370 0

पुणे : अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज (सोमवार, 13 फेब्रुवारी 2024) 394 वी जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. यासाठी किल्ले शिवनेरीवर हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत.

या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, शिवजन्मोत्सवात सहभागी होणार आहेत. फक्त शिवनेरीच नव्हे, तर राज्यातील विविध गडकिल्ल्यांवरही अनेक संस्थांच्या वतीनं शिवजन्मोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!