Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

498 0

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या घर चलो अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवंशी क्षेत्रीय कार्यालय आप्पा बळवंत चौक येथे हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळें चला पाहुयात…

पक्षामध्ये येण्याचा जर त्यांचं मत असेल, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आणि त्यासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत जस की अशोक चव्हाण, अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे. जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे.

एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मी वारंवार सांगत आहे की केंद्रीय,आमची राज्याची समिती आता विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील तुटक-तुटक निर्णय होणार नाही. आमच्या राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल…. मग कुठल्याही गोष्टीचा योग्य निर्णय होईल. पण जर एकनाथ खडसे यांच भाजपामध्ये येण्याच मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल.

एकनाथ खडसे यांचे अमित शाह आणि जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्याचे 15 दिवसापूर्वी फोटो आले आहेत, यावर समिती आता काय विचार करणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अमित शाह आणि जेपी नड्डा साहेब हे नेहमीच सर्वांना भेटतात. आम्हीही त्यांना रोज भेटतो. त्यामुळे कुठलाही वाद नाही, पण एक निर्णय प्रक्रिया आहे यामधून सर्वांना जावे लागते.

देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला विरोध आहे का? यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचा पक्षप्रवेशाला विरोध नाही… देवेंद्र फडणवीस हे कधीही एकनाथ खडसे यांच्याविरोधात नाही. एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातील स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिल आहे याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य केले. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे साहेबांचा सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात…… देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News
error: Content is protected !!