मोठी बातमी! चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन

816 0

पिंपरी-चिंचवड: पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून शाई फेक करण्यात आली. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण होतं .

याच संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली असून  चंद्रकांत पाटील शाईफेकी प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. सुरक्षेत कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!