कोरोना काळातील व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे घेणार – देवेंद्र फडणवीस

291 0

पुणे: शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परत लॉक डाउन लावल्याने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते.

व्यवसायच बंद असल्याने व त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केले होते.

शांततमाय मार्गाने केलेल्या ह्या आंदोलनात कोणतीही दगडफेक ,जाळपोळ ,सरकारी मालमत्तेचे नुकसान अशी कोणतीही घटना तसेच कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उदभवली नसताना जाणीवपूर्वक खटले दाखल करण्यात आले होते.

व्यापाऱ्यांवर कोरोना काळात काय बीतले आहे याची जाणीव असून त्यांची मागणी रास्त आहे त्यांच्यावरील खटले विनाविलंब मागे घेतले जातील असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांना दिले.

तसेच पुढील कार्यवाही जलद व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा अशे निर्देशही माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले.

या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील ,माजी महापौर मुरलीधर मोहोळ ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने ,गणेश बिडकर इ.उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!