PUNE DEEPAK MANKAR SON बनावट दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादीचे माजी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळत असून
दीपक मानकरांचे पुत्र करण दीपक मानकर आणि व्याही सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेत. PUNE DEEPAK MANKAR SON
पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात या दोघांवरही दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी फिर्याद दिली आहे
यानुसार एका गुन्ह्यात शंतनू कुकडे सुखेन सुरेशचंद्र शहा रौनक भरत जैन आणि इतर तर दुसऱ्या गुन्ह्यात शंतनू कुकडे करण दीपक मानकर आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंतनू कुकडे याच्यावर एका विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आधीच पाच गुन्हे दाखल आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
AJAY TAWARE KIDNEY RACKET| पोर्शे प्रकरणानंतर ससूनचे डॉ अजय तावरे याचा आणखी एक कारनामा समोर!
पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, कुकडेच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात सुमारे पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते.
तसेच, करण मानकर यांचे सासरे सुखेन शहा यांच्या खात्यात तब्बल सहा कोटी ५२ लाख रुपये वर्ग झाले आहेत. या व्यवहारांबाबत पोलिसांनी मानकर यांच्याकडे विचारणा केली.
त्यावेळी त्यांनी कुकडेसोबत जमीन खरेदीचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली, पण ती बनावट असल्याचे पोलिसांना आढळून आले त्यानंतर दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.