Breking News-शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

623 0

पुणे- लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ बबनराव कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित तरुणीने जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले.

गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!