L3 बार मधील पार्टीत मुंबईहून आणलेले मेफेड्रोन घेतल्याने 2 तरुणांना अटक; ड्रग्स घेतल्याची आर्किटेक्ट आणि इंजिनियर तरुणांची कबुली

1288 0

पुण्यातील एफ सी रोड परिसरात असलेल्या एल थ्री बार मधील एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही तरुण आमली पदार्थांचं सेवन करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक केली. त्याचबरोबर पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान काल L3 बारमध्ये पार्टी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तरुणांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती मात्र त्यापूर्वीच या दोन्ही तरुणांनी पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केल्याची कबुली दिली आहे.

नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई) व करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. तर त्यांनी या पार्टीमध्ये मुंबईहून आणलेल्या मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नितीन ठोंबरे हा आर्किटेक्ट म्हणून काम करतो, तर करण मिश्रा हा एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता आहे. हे दोघे चांगले मित्र आहेत. आणि याआधी ते अशा प्रकारे ड्रग्सचे सेवन करत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या पार्टीमध्ये ड्रग्स कोणी आणले ? इव्हेंट मॅनेजरने पुरवले ? बार मधील कर्मचाऱ्यांनी पुरवले की मग हे तरुण स्वतः आपल्या सोबत ड्रग्स घेऊन आले होते याचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!