मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी या परिसरात रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुस्लिम बांधवांकडून जुलूस मिरवणुक काढण्यात आली होती. त्यावेळी दोन जण हातात झेंडा घेऊन डीजेच्या भिंतीवर चढले. त्याचवेळी झेंडा फडकवत असताना एकाचा हात विजेच्या तारेला चिटकला. ज्यामुळे दोन्ही मुलांना विजेचा धक्का बसला. यातील एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.