श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे 9 व्या रक्तदान शिबिरात 297 बॅग रक्त संकलित

336 0

पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे समाधी सोहळ्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 9 व्या रक्तदान शिबिरात 297 जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू डाॅ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. पराग काळकर, सांईस्नेह हाॅस्पिटलचे डॉ. सुनील जगताप, दादा सणस, सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त सुरेश येनपुरे, नागराज नायडू, निलेश मालपाणी, प्रताप भोसले, रक्ताचे नातेचे राम बांगड आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला ससुन रुग्णालय रक्तपेढी, केईएम हाॅस्पिटल रक्त पेढी आणि रक्ताचे नाते संस्थेचे सहकार्य लाभले.

डाॅ. नितीन करमाळकर यांनी न्यासाच्या रक्तदान शिबिर उपक्रमाचे कौतुक केले. श्री सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टतर्फे पुणे विद्यापीठामध्ये गरजु विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी जरूर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. सुनील जगताप म्हणाले, ” रक्ताची उणिव फक्त रक्तदानानेच भरून काढावी लागते. मठाच्या रक्त संकलन शिबिराने इतर धार्मिक संस्थाना आदर्श धालून दिला आहे”

या शिबिरात 297 बॅग रक्त संकलन झाले अशी माहिती रक्ताचे नातेचे राम बांगड यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष श्री भगवान खेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!