पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसंस्कृत पुण्याला अजूनही अंधश्रद्धेचा विळखा बसलाय असं म्हणण्यासारखी एक घटना समोर आली आहे. मोठ्या आयटी कंपनीच्या संचालकांच्या घराबाहेर करनी करण्याचा प्रयत्न झालाय. पीडित व्यक्तीची होत असलेली प्रगती आणि भरभराट पाहून त्यांच्या सोसायटीतील इतर लोकांनी त्यांच्यावर करणी करण्याचा प्रयत्न केलाय, या घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होत आहे.
पुण्यातील परिसरातील सुप्रिया सोसायटीमध्ये ही घटना घडली. पीडित व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना सोसायटीतील लोकांनी बहिष्कृत करून वाळीत टाकले होते. त्यांच्या मुलीबरोबर खेळायलाही इतर लहान मुलांना परवानगी नव्हती. तर सोसायटीतील कुणीही त्यांच्याशी बोलतही नव्हते. अशातच संचालकाच्या घराबाहेर लावलेल्या दिव्यांवर नारळ फेकून करणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर हा मानसिक त्रास सहन न झाल्याने पीडित कुटुंबाने चतुःर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल केले असून घटनेचा तपास चालू आहे.