pune bjp omkar kadam: वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आल्याने
पुणे भाजपच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम(pune bjp omkar kadam) हे प्रचंड चर्चेत आलेत.
एकीकडे ओंकार कदम हे अधिकाऱ्यांशी अरेरावी आणि दमदाटी करण्याच्या भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात येतोय तर
दुसरीकडे आता त्यांच्यात समर्थकांचा एक नवा प्रताप समोर आलाय. संबंधित महिला अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारण्याची धमकी ओंकार कदम
यांच्या महिला समर्थकांनी दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया..
Bjp पदाधिकारी Omkar Kadam च्या सहकाऱ्यांकडून FB LIVE ! महिला अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा!
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये वारंवार जात दमदाटी करत
आरेरावीची भाषा करत मानसिक छळ केल्याचा आरोप हा ओंकार कदम यांच्यावर करण्यात आला आहे.
संबंधित महिला अधिकाऱ्याने प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे
अखेर या महिलेने महिला आयोगात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ओंकार कदम यांनी पुणे महानगरपालिकेच्याच आवारात एक पत्रकार परिषद घेतली.
त्यामध्ये संबंधित महिलेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले.
महिला आयोगाच्या चौकशीला आपण सामोरे जायला तयार असल्याचं ओंकार कदम यांनी सांगितलं.
मात्र या पत्रकार परिषदेत ओंकार कदम यांच्याबरोबर जे इतर कामगार होते, त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे.
पत्रकार परिषद झाल्यावर लगेचच कंत्राटी कामगार असलेल्या महिलांनी ओमकार कदम यांच्या समर्थनार्थ महानगरपालिकेच्याच आवारामध्ये एक फेसबुक लाईव्ह केलं.
ज्यामध्ये संबंधित महिला अधिकारी कदम यांच्यावर खोटे आरोप करत असून त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांच्या अंगावर आम्ही कपडे ठेवणार नाही, मारहाण केली जाईल अशा पद्धतीचा इशारा या लाईव्ह मध्ये दिला.
दरम्यान हे सगळं प्रकरण लक्षात येताच पुणे महानगरपालिकेने ओंकार कदम आणि त्यांच्या
समर्थकांना पुणे महानगरपालिकेच्या आवारात येण्यास प्रवेश बंदी केली. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाला चार दिवस उशिरा जाग आली
आणि त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना एक पत्र लिहीत, संबंधित लोकांना पोलीस ठाण्यात बोलवून पुणे महानगरपालिकेत न येण्यासंदर्भातली समज देण्याची विनंती केली.
त्याचबरोबर पोलिसांनाही याविषयीची माहिती दिल्याचं नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं.