पुणेब्रेकिंग न्यूज

भाजप आमदार अमित गोरखेंच्या पत्नीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप; रुग्णालय प्रशासनानं केली होती दहा लाखांची मागणी

दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

3 लाख भरण्याची तयारी कुटुंबीयांनी दाखवली. पण, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने प्रवेश नाकारला. महिलेला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करावे लागले. पण, दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपचे विधानपरिषदेतील आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.