पराभव समोर दिसल्याने भाजपा नेते भांबावले ;राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचं गणेश बीडकरांना प्रत्युत्तर

187 0

जेंव्हापासून कोल्हापूरातून येऊन चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपा पक्ष खिशात घातला तेंव्हापासून पुणे शहर भाजपामध्ये भयंकर गोंधळ सुरु असून त्यांची विधाने देखील विसंगत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणूकीत पराभव थेट समोर दिसू लागल्यापासून सगळेच नेते भांबावले असून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी आज केलेली विधाने याचेच स्पष्ट उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिली आहे.
देशमुख म्हणाले, की ” एकीकडे बीडकर शंभर प्लस जागा जिंकण्याचा दावा करतात आणि दुसरीकडे प्रभाग रचनेविषयी राज्यसरकार ने सत्तेचा दुरूपयोग केला म्हणतात , जर त्यांना शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा ठाम विश्वास असेल तर ते थेट निवडणूक प्रचारालाच का सुरुवात करीत नाहीत ? हा केवळ एकट्या बीडकर यांचा प्रॉब्लेम नसून भाजपाचे सगळेच नेते थोड्याफार प्रमाणात भांबावलेले असून निवडणूकीपुर्वीच त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.”
आपलं सगळं आलबेल चाललेलं असताना बाहेरुन आलेल्या माणसानं आपल्यावर बॉसींग करणं हे शहर भाजपातील बहुतांश नेत्यांना आजही पचनी पडलेलं नाही. त्याचे फस्ट्रेशन काढण्यासाठी ते अशा प्रकारचे दावे करतात.
बीडकर यांनी केलेले दावे आणि त्यामागचे कारण लक्षात येत असून त्यांच्याप्रती पुर्ण सहानुभूती आहे असेही देशमुख शेवटी म्हणाले.

Share This News

Related Post

पुणे : “मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन”

Posted by - October 18, 2022 0
पुणे : महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर निदर्शने…

एसटी महामंडळामार्फत ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’; असा घेता येणार लाभ

Posted by - September 11, 2022 0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट २०२२ पासून एसटी महामंडळामार्फत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची विशेष योजना सुरू करण्यात आली…
Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांना मुंबई न्यायालयाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Posted by - April 11, 2023 0
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून…
Lift

Lift collapses in Mumbai: कमला मिलमधील ट्रेड वर्ल्ड इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली; 15 जण जखमी

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : लोअर परळमधील कमला मिलमध्ये लिफ्टला भीषण अपघात (Lift collapses in Mumbai) झाला आहे. संबंधित लिफ्ट चौथ्या माळ्यावरून कोसळली…
Pm Post

‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; राऊतांनी थेट सांगूनच टाकलं !

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections0 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विरोधकांनी एकजूट व्हयला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *