मोठी बातमी! पुण्यातील रिक्षाचालकांचा संप तूर्तास स्थगित 

298 0

पुणे : बेकायदा बाईक,टॅक्सीच्या विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील रिक्षा संघटनांनी आंदोलनात सुरुवात केली होती जोपर्यंत शहरातील बाईक,टॅक्सीच्या बंद होत नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा पवित्रा रिक्षा संघटनांनी घेतला होता.

मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलनस्थळी येऊन रिक्षाचालकांची घेतली भेट घेऊन पुढील 8 ते10 दिवसांत बाईक टॅक्सी बाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर 12 डिसेंबर पर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र 12 डिसेंबर पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा अस्त्र उभारणार असल्याचा इशारा रिक्षा संघटनांकडून देण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!