Bhugaon Bypass Road Project: गेल्या काही वर्षांपासून पुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भुगाव येथे होत असलेली वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी अतिशय (Bhugaon Bypass Road Project) त्रासदायक ठरत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रखडलेल्या बायपासच्या कामाला गती देण्याचे आदेश दिल्याने मुळशीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम आता पुढील नऊ महिन्यांत पूर्णत्वास येणार आहे.
भुगाव हे पुण्याजवळील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी स्थानिक रहिवाशांसह पुणे-कोकण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 9Bhugaon Bypass Road Project) मोठी डोकेदुखी ठरली होती. अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासासाठी तासंतास गाड्यांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात होते. या समस्येवर बायपास हाच एकमेव उपाय होता, मात्र जमीन अधिग्रहणामुळे त्याचे काम अनेक वर्षे रखडले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) या कामासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी (Bhugaon Bypass Road Project) पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ स्थानिकांनाच नव्हे, तर बावधन, हिंजवडी आणि पिरंगुटच्या दिशेने कोकणमार्ग प्रवास करणाऱ्या लाखो वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. बायपासमुळे वाहनांना गावाच्या आतून जावे लागणार नाही, त्यामुळे भुगावमधील स्थानिक रहिवाशांना होणारा त्रासही कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटण्यास मदत होईल.
CHHAGAN BHUJBAL ON MARATHA RESERVATION:खोट्या कुणबी नोंदी थांबवण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी
हा बायपास पूर्ण झाल्यानंतर वेळ आणि इंधन यांची बचत तर होईलच, पण त्यासोबतच कोकण प्रवासाचा मार्ग अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनेल. स्थानिक नागरिकांचा संघर्ष आणि गडकरींच्या हस्तक्षेपामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागत आहे, ज्यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्थेत क्रांती घडणार आहे. या बायपासमुळे पुणे-कोकण महामार्गावरील प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. स्थानिकांच्या मागणीला यश आल्याने मुळशी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. आता NHAI या आदेशाची कशी अंमलबजावणी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.