पिंपरी-चिंचवड महापालिकेला आली जाग, भोसरीच्या उड्डाणपुलाला १२ वर्षानंतर सुरक्षा कठडे

185 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावण्याचे शहाणपण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचले आहे. त्यामुळे महापालिका गेल्या बारा वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत होती का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कोणताही उड्डाणपूल सुरू करताना त्याच्या सेफ्टी एनओसी संबंधित विभागाकडून घेण्यात येतात. भोसरी उड्डाणपुल सुरू करताना देखील सेफ्टी एनओसी घेण्यात आल्या असाव्यात. मात्र सफ्टी एनओसी घेतल्यानंतर बारा वर्षांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावले आहेत. त्यामुळे महापालिकेला बारा वर्षानंतर उशिरा शहाणपण सुचलं की काय ? अशी उपरोधक टीका होत आहे.

उड्डाणपुलाला खरंच सुरक्षा कठडे यांची आवश्यकता होती का ? का फक्त ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे लावले ? असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. तर महापालिकेच्या महापालिकेच्या स्थापत्य विभागाने या विषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. उड्डाणपुलाच्या क्रॅशगार्डची उंची कमी असल्याने आम्ही ती उंची वाढविण्यासाठी सुरक्षा कठडे वाढवून लावले आहेत अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

Posted by - October 10, 2022 0
पिंपरी चिंचवड : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसा भांडवल नसल्या कारणाने, द…

Cold Blooded Murder :बॅग घेऊन जात असतानाचा आफताबचा तो व्हिडिओ व्हायरल; त्या बॅग मध्ये…. पहा व्हिडिओ

Posted by - November 19, 2022 0
नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने तिचे 36 तुकडे केले. तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! पुण्यात अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) खूप वाढले आहे. पुण्यातील हडपसरमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून धारदार लोखंडी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *