BHOR DHANAVALI: पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील धनावली या दुर्गम आदिवासी पाड्यावरील एका घटनेने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह (BHOR DHANAVALI) निर्माण केले आहे. एकीकडे देश विकासाच्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे, हे या घटनेतून समोर आले आहे. रस्त्याअभावी एका जावयाने आपल्या आजारी सासूला खांद्यावर घेऊन तब्बल पाच किलोमीटरचा प्रवास चिखलातून केला, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.
Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana: सरकारची नवी योजना; मोफत सौर कृषी पंप मिळणार
ही घटना आहे सुरेश वाघमारे आणि त्यांच्या सासू बानुबाई धनावले यांची. बानुबाई यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती (BHOR DHANAVALI) बिघडत चालल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात नेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर रस्ता पूर्णपणे चिखलाने भरलेला असतो. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही.
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ
मानुसकीची भावना मनात ठेवून जावई सुरेश वाघमारे यांनी कोणताही विचार न करता आपल्या आजारी सासूला पाठीवर घेतले. चिखलाने भरलेल्या (BHOR DHANAVALI) रस्त्यावरून आणि निसरड्या वाटांमधून ते पायी चालत निघाले. धनावली पाड्यापासून निगुडघर गावापर्यंतचा पाच किलोमीटरचा प्रवास त्यांनी सासूला खांद्यावर घेऊन केला. हा प्रवास केवळ शारीरिकदृष्ट्या थकवणारा नव्हता, तर प्रशासनाच्या उदासीनतेची जाणीव करून देणारा होता.
MNS LEADER ABHIJEET PANASE DIRECT MOVIE: मनसे नेते अभिजीत पानसे करणार चित्रपट दिग्दर्शित
दरवर्षी निवडणुका आल्या की, या आदिवासी भागातील लोकांना अनेक आश्वासने दिली जातात. ‘पाड्यांचा विकास करू’, ‘रस्ते बांधू’, ‘आरोग्य सुविधा पोहोचवू’ अशा घोषणा केल्या जातात. मात्र, निवडणुका संपताच ही आश्वासने हवेत विरून जातात आणि आदिवासी बांधवांना पुन्हा त्यांच्या नशिबावर सोडून दिले जाते. वर्षानुवर्षे त्यांना चिखल तुडवत आणि मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत जगावे लागत आहे.
सुरेश वाघमारे यांनी सासूला खांद्यावर घेऊन केलेला हा प्रवास केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा अनेक घटना या दुर्गम भागात घडत असतात. कधी एखाद्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी खाटेवर टाकून घेऊन जावे लागते, तर कधी तातडीच्या उपचारांअभावी एखाद्याचा जीव जातो. स्वातंत्र्याला अनेक दशके उलटूनही ही परिस्थिती बदललेली नाही, हे दुर्दैव आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनावर मोठी टीका होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. या भागातील लोकांना केवळ आश्वासने नको आहेत, तर त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या सुविधा हव्या आहेत. एकीकडे भारत ‘विकसित राष्ट्र’ होण्याचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे देशातील एका नागरिकाला उपचारासाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागणे, ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे.