Bhima Koregaon

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाचा 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतून खर्च करावा : राहुल डंबाळे

637 0

पुणे : पुणे जिल्हा तालुका हवेली मौजे पेरणे येथील सन 1818 साली भिमाकोरेगाव (Bhima Koregaon) लढयामध्ये अद्वितीय शौर्य गाजविणाऱ्या शुरवीर महार योध्याच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या भिमाकोरेगांव विजयस्तंभ अभिवादनासाठी म्हणजेच 01 जानेवारी 2024 रोजी शौर्यदिन साजरा करण्यासाठी देशभरातुन किमान 20 लाख भिम अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहेत. सदर शौर्यदिनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हधिकारी पुणे यांचे अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीने अभिवादन सोहळयासाठी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्व त-हेच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे 14 कोटी रुपयांची निधीची मागणी विविध विभागांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) , पुणे यांचेकडे केलेली आहे.

शौर्यदिनाचा हा संपूर्ण खर्च बार्टीकडून न करता यंदाच्या वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे खात्यातून करावा अथवा जिल्हाधिकारी पुणे यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीला राज्य शासनाकडून स्वतंत्रपण बजेट उपलब्ध करुन देण्यात येवून त्याव्दारे हा भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा साजरा करण्यात यावा अशी मागणी आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती च्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे , माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, बसपा शहर अध्यक्ष रमेश गायकवाड, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मिलिंद अहिरे यांचेसह सत्यवान गायकवाड, शबाना मुलाणी इत्यादी पदाधिका-यांनी केली.दरम्यान सदर मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांना पाठविण्यात आले असून याची कॉपी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे दिलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!