Supriya Sule

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

383 0

बारामती : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या सगळ्यात बारातमी लोकसभा (Supriya Sule) मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ते पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
“हा काही भातुकलीचा खेळ नाही. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील. पण माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक वैचारिक बैठक आहे. ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही. माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचाराशी माझी लढाई आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!