पुण्यात जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, एकजण गेला वाहून (व्हिडिओ)

365 0

पुणे- पुण्यातील पर्वतीपायथ्याला असलेल्या जनता वसाहतीजवळ एक ऑटोरिक्षा कॅनॉलमध्ये पडल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत रिक्षामधील एकजण वाहून गेला असून अग्निशामक दलाकडून त्याचा शोध सुरु आहे.

ऑटोरिक्षा (एम एच 12 एच सी 4453) रिव्हर्स घेत असताना रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा शोध लागला नाही. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत शोध सुरु केला. मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही. घटनास्थळापासून काही अंतरावर रिक्षा आढळून आली. वाहून गेलेली व्यक्ती रिक्षाचालक होता की प्रवासी याचा तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!