पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू

284 0

पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू झालायं. तर एक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत पोलिसांना जवळपास तीस गावठी बॉम्ब सापडले आहेत. वडमुखवाडी परिसरातील पाच वर्षांची चिमुकली राधा ही तिच्या दोन मित्रांसोबत कचराकुंडी जवळ खेळत असताना तिला छोट्या बॉल सारख्या वस्तू पडलेल्या दिसल्या. तिने ते उचलून आणल्यानंतर खेळत असताना त्याचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पोलिसांना सापडलेले तीस बॉम्ब गोळे हे शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या परिसरात पारधी आणि गवळी समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे या ठिकाणावर बॉम्ब गोळे कुणी आणून टाकले याचा तपास दिघी पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!