AJIT PAWAR VISIT KUNDMALA: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली.
या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून
लवकरात लवकर उभारणी करावी (AJIT PAWAR VISIT KUNDMALA), असे निर्देश त्यांनी दिले.
KUNDMALA BRIDGE COLLAPSE: मालकाला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या छोटूचं सर्व स्तरातून कौतुक
यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली.
तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.
KUNDAMALA BRIDGE COLLAPSE: “फादर्स डे”च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ
घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे.
KUNDMALA RESCUE OPERATION: 51पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले
इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही पवार म्हणाले.