पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या पिकअपची कंटेनरला धडक १ ठार, दोन जखमी

2479 0

तळेगाव- कंटेनरला पीकअप गाडीने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी सहाच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्ड गावच्या हद्दीत झाला.

पुण्यावरून मुंबईला कोंबड्यांची वाहतूक करणारा पीकअप टेम्पोच्या चालकाने भरधाव जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली. या अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. जखमींना ट्रॉमा केअर सेंटरला दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मागील काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide