10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कुस्तीवरून पंच मारुती सातव यांना संग्राम कांबळे या व्यक्तीकडून धमकी वजा फोन आल्याबाबत स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
महाराष्ट्र केसरीच्या पंचाना धमकावणाऱ्या पोलिस शिपायाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.