ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणी नऊ पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय
याप्रकरणी पीएसआय जनार्दन काळे, मोहिनी डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव हवालदार आदेश शिवणकर नाईक, नाथाराम काळे शिपाई पिरप्पा बनसोडे, आमित जाधव अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत
अमली पदार्थांच रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील सोमवारी रात्री उपचारांदरम्यान नाट्यमय रित्या ससून रुग्णालयातून पसार झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे