पुणे: पुण्यातून एक मोठी समोर आली असून नियोजित गृहप्रकल्पाची कमान कोसळून एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्णव मिथिलेश राय (वय 7, सध्या रा. गुलमोहोर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी अर्णवचे वडील मिथिलेश राय (वय 36) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.