पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 25 टीएमसी पाणीसाठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांचा पाणीसाठा 86 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून सद्यस्थितीत या धरण साखळी प्रकल्पात 25.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
25 जुलैपासून पुणे शहर व परिसरात दमदार पाऊस बरसत असून यामुळे खडकवासला पानशे टेमकर आणि वरसगाव या चारही धरणातील पाण्याचे पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला धरणात 77.7% पानशेत धरणात 90.42% वरसगाव धरणात 85.41% टेमघर धरणात 85.91% पाणीसाठा असून एकूण चारही धरणातील पाणीसाठा 86. 74% इतका आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी असल्याने संपूर्ण पावसाळ्यात 0.5 टीएमसी पाणी सोडलं होतं त्याचबरोबर मागील वर्षी आजच्या दिवशी खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 22.20 टीएमसी म्हणजे 66.61% पाणीसाठा होता
