पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन गणेश विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असताना पुण्यामध्ये ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली लक्ष्मी रोड मार्गे विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकामध्ये येताना पाहायला मिळत आहे पुण्यातील दुसरा मानाचा गणपती असणाऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाची सकाळी साडेआठच्या सुमारास विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती सकाळी दहा वाजता लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर लक्ष्मी रोड मार्गे ही मिरवणूक अलका टॉकीज चौकामध्ये आले आणि साधारणतः पाच वाजण्याच्या सुमारास या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं.