पुण्यातून दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांचं निधन झालं आहे.
पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.
सन 2001 ते 2007 या काळात विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.