Beed News

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

520 0

बीड : बीडमधून (Beed News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही काळ हा कार्यक्रम थांबवण्यात आला, तसेच घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करावं लागलं.

काय घडले नेमके?
स्वराज्य शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा, मुंडे यांच्यावतीने बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर लोकसभा निवडणुकीचा कार्यकर्ता मेळावा व महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साड्या वाटपाच्या कार्यक्रमात महिलांची साड्या घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात साड्यांचं वाटप सुरू असताना महिलांनी थेट स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला, तसेच एकमेकींच्या हातातून साड्या ओढून घेतल्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हा गोंधळ थांबवला. यामुळे हा कार्यक्रम काही वेळ मध्येच थांबावावा लागला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!