काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

373 0

गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहेत.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.

तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन सभेसह अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या होत्या.तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर कोल्हापुरात तळ ठोकून होते त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!