4 तारखेपासून अजिबात ऐकणार नाही; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट इशारा

409 0

2 एप्रिल ला शिवाजी पार्क वर झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्याबाबतची भूमिका मांडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद मधील सभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

आज 1 तारीख आहे 3 तारखेला ईद आहे मात्र 4 तारखे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर कोणाचही ऐकणार नाही असा थेट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

औरंगाबादचं मूळ नाव खडकी, आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच, एक देवगिरीचा किल्ला दुसरी पैठण. महाराष्ट्र समूजन घेणं गरजेचं आहे, तो समजून घेऊ. जो जो इतिहास विसरला त्याच्या पायखालचा भूगोल सरकला असे राज ठाकरे म्हणाले. आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. आयुष्यभर शरद पवार यांनी जाती-पातीत भेद निर्माण करण्याचं काम केलं असं म्हणत ठाकरे यांनी पवारांवर टीका केली.

Share This News
error: Content is protected !!