कसबा चिंचवडची पोटनिवडणूक मनसे लढवणार?

540 0

पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सर्वच पक्षांची ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. 

1 किंवा 2 फेब्रुवारी दरम्यान भाजपा आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता असून आता या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंसुद्धा उडी घेतली आहे.

मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून मनसे नेते अनिल शिदोरे बाबू वागसकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून या पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं मत मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी व्यक्त केलं

Share This News
error: Content is protected !!