मुंबई: राज्यात सध्या लाडकी बहीण योजना सुरू असून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारकडून ही योजना विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन सुरू केली असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जात असून आता या योजने संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकताच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री अजित पवार यांना लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणार का असा प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना अजित पवारांनी म्हटल आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना कोणती योजना प्रभावी ठरली हे मतदार ठरवत असतात मात्र लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात च्या 3000 रुपये मिळालेल्या हप्ता मधून आपला व्यवसायही सुरू केला आहे असं अजित पवार म्हणाले आहेत