मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
यातच आता शिंदे गटाची गोव्यात सुरू असलेली बैठक संपली असून एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
दुपारी 3 ते 3:30 च्या दरम्यान ही भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.